मी सध्या कॉर्क, आयरलँड येथे कॉलिन्स एरोस्पेस ॲपलाईड रीसर्च & टेक्नॉलॉजी (पूरवीचे युनायटेड टेक्नॉलॉजीज् रीसर्च सेंटर) मधे प्रमुख तंत्रज्ञानशास्त्रज्ञ आहे.
मी कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटी येथे इलेक्ट्रिकल आणि कम्पयूटर इंजिनीयरिंग मधे २०१४ साली डॉक्टर ऑफ् फिलॉसॉफी, आणि २००९ साली मास्टर ऑफ् सायन्स ही पदवी मिळवली. त्या आधी २००८ साली मी इंडियन इंस्टिट्यूट ऑफ् टेक्नॉलॉजी बॉम्बे (भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई) मधून बॅचेलर ऑफ् टेक्नॉलॉजी इंजिनीयरिंग फिजीक्स पूर्ण केलं.
माझ्या “Longest Straight Line Paths on Water or Land on the Earth” ह्या पेपरला अलीकडे इंटरनेटवर थोडीफार प्रसिद्धी मिळाली. विशेषतः सायन्स, एमआयटी टेक्नॉलॉजी रिव्ह्यू, अॅटलस ऑब्स्क्युरा, पॉप्युलर मेकॅनिक्स, गिज्मोडो, स्मिथसोनियन, आणि न्यूजवीक यांनी ह्याबद्दल लेख प्रकाशित केले. १९ नोव्हेंबर २०१८ला जर्मनीतील Das Erste ह्या चॅनेलवरील Wer weiß denn sowas? ह्या प्रश्नमंजुषा कार्यक्रमात एक प्रश्न म्हणून त्याचा उल्लेख केला गेला.
२००३ साली मी स्टॉकहोम, स्विडन येथे २ ते ८ ऑक्टोबर या काळात झालेल्या आठव्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिम्पियाड मधे भारताचे प्रतिनिधित्व केलं, व सुवर्णपदक मिळवले.